• About
  • Gallary
  • Video
  • Article
  • Blog
  • Contact
personal-logo
Freelancer delivering exceptional Webflow, and Next.js solutions.

I am a skilled freelancer specializing in Webflow development, Figma design, and Next.js projects. I deliver creative, dynamic, and user-centric web solutions.

Call Now +92 (8800) - 98670
Mail Us example@info.com
My Address 66 Broklyant, New York 3269
find with me
  • About
  • Gallary
  • Video
  • Article
  • Blog
  • Contact
find with me
banner-img

ओंकार सविता शिवाजी तुपे (पाटील )

राष्ट्रीयत्व : भारतीय

जन्म : 22/07/1999

जन्म ठिकाण : कोल्हार (भगवतीपुर) अहमदनगर

वडिल : शिवाजी विठ्ठल तुपे पाटील

राजकीय पक्ष : शिवसेना (UBT)

मागील : युवासेना शहर प्रमुख वाघोली पुणे .

पद : युवासेना उपजिल्हा प्रमुख पुणे ,अध्यक्ष सर्वोदय ग्रुप पुणे

शिक्षण: बी ए

निवास : वाघोली पुणे

संकेतस्थळ : www.omkartupepatil.com

Founder : (omkar tupe patil foundation)

व्यवसाय : राजकीय

वैयक्तिक जीवन: पुणे वाघोली मधून दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून, तुपे यांनी भारतीय जैन सांगटना महाविद्यालय वाघोली येथून पदवी शिक्षण घेतले..

राजकारणाची आवड जोपासत ओंकार तुपे तरूणाने जोपासली सामाजिक बांधिलकी | बदलत्या काळात राजकारणसुध्दा बदलले असल्याचा समज समाजाचा झाला आहे. परंतु राजकारणातूनच समाजकारण करता येणे शक्य असल्याचा पुण्यातील वाघोलीतील शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सांभाळणारा ओंकार तुपे याने दाखवून दिले. महाविद्यालयीन जीवनापासूनच राजकारणाची आवड जोपासून सामाजिक बांधिलकी जोपासत आहे. मुळचा वाघोलीतील रहिवासी असलेला ओंकार तुपे याचे प्राथमिक ते महाविद्यालयीन जीवन वाघोलीतमध्ये झाले. वडिलांचे स्वत:चे ट्रॅक्टरचे गॅरेज तर आई गृहिणी, लहान भाऊ अशा कुटूंबातून ओंकार याने बी.ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. घरात राजकारणाचा कोणताही वारसा न लाभलेल्या ओंकार तुपे याने महाविद्यालयीन जीवनापासूनच विविध सामाजिक कार्य करण्यास सुरूवात केली होती.

२०१६ मध्ये ओंकार तुपे पाटील फाऊंडेशन महाविद्यालयीन जीवनापासूनच ओंकार तूपे याने हिंदूहदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची भाषणे एकत होते. त्यांना आदर्श मानून ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण अशापध्दतीचे सूत्र ठेवले. घरच्यांकडून राजकारणात जाण्यापासून विरोध होता. परंतु २०१६ मध्ये स्थापन केलेल्या ओंकार तुपे पाटील फाऊंडेशनच्या माध्यमातून होत असलेल्या सामाजिक कार्यामुळे घरच्यांनीसुध्दा पाठिंबा दिला. सामाजिक क्षेत्रात विविध कार्य ओंकार तुपे यांचा वाढदिवस साजरा न करता अनाथालय आणि वृध्दाश्रमातील लोकांना मदत करतात. एवढेच नाहीतर दिवाळीसुध्दा त्यांच्यासोबत साजरी करतात.

त्यांच्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येतात. कोल्हापूर ते कोकण अशा ठिकाणी आलेल्या पूरग्रस्तांना मदत करणे, कोविडच्या काळात २०० ते ४००० महाविद्यालयीन तरूणांना जेवणाचे डब्बे पुरविणे. दरवर्षी हिवाळयात थंडीत कुडकूडणाऱ्या लोकांना ऊबदार ब्लँकेटचे वाटप केले जाते. त्यासोबत किल्ले बनवा स्पर्धेतून ऐतिहासिक वारसा जपण्याचा संदेश उपक्रमातून देत आहेत. या स्पर्धेतील विजेत्यांना गेल्या चार वर्षांपासून हेलिकॉप्टरची राईडसुध्दा देत आहेत. एवढेच नाहीतर समाजातील विविध समस्या, प्रश्न सोडवण्यावर भर देत आहे. तसेच सर्वोदय ग्रुपच्या माध्यमातून दरवर्षी गणेश मंडळातर्फे विविध स्पर्धा, महिलांसाठी सांस्कृतिक मोठया उत्साहात साजरे केले जाते, होम मिनिस्टर असे उपक्रम राबवले जात आहे. शिवसेना कार्यकर्ता ते उपजिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी महाविद्यालयात असल्यापासून बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित ओंकार तुपे यांनी २०१५ मध्ये शिवसेनेत सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करण्यास सुरूवात केली. समाजाप्रती काम करण्याची आस्था पाहून २०१६ मध्ये उपशहर प्रमुख पद मिळाले.

यानंतर २०१८ मध्ये शहर प्रमुख तर २०२३ मध्ये उपजिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. राजकारणाच्या माध्यमातून तरूणांचे विविध प्रश्न सोडवले.दरवर्षी आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिरासारखे उपक्रम राबवले जात आहेत. तसेच कब्बडी, हॉलिबॉल, फूटबॉल, क्रिकेट स्पर्धेचे आयोजन व खेळाडूंना साहित्य वाटप केले. मराठा समाजासाठी आरक्षण मिळवण्यासाठी आंदोलने केली. कंन्स्ट्रक्शन क्षेत्रातही प्रगती समाजकारण, राजकारणासोबतच ओंकार तुपे यांनी स्वत:च्या प्रगतीकडेसुध्दा लक्ष दिले. कन्स्ट्रक्शन आणि प्लॉटिंगच्या व्यवसायसुध्दा चांगल्या पध्दतीने करत आहे.

व्यवसाय व राजकारणात काम करताना संपूर्ण महाराष्ट्रभर संपर्क वाढला आहे. प्रतिक्रिया तरूणांनी राजकारणात आले पाहिजेत राजकारणात आल्यानंतर सामाजिक कार्य चांगले पध्दतीने होवू शकते. यासाठी तरूणांनी राजकारणात आले पाहिजेत. समाजासाठी काम केले पाहिजेत. यापुढे पक्षातर्फे जी काही जबाबदारी देईल त्यात चांगले काम करणार. यात तरूणांसाठी चांगले काम करण्याचा मानस आहे. ओंकार तुपे, उपजिल्हाप्रमुख

©Go Print Media | All Rights Reserved

  • Trams & Condition
  • Privacy Policy
  • Contact Us